Hard Copy Price:
41% OFF R 340R 200
/ $
2.56
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
`गाथा एका विठ्ठलाची!` ले. नलिनी कुलकर्णी हे पुस्तक म्हणजे संस्कृत पंडित, उत्तम शास्त्रीय गायक व नामवंत संवादिनी वादक पंडित विठ्ठलराव सरदेशमुख यांचा जीवनपट आहे. उत्तम शास्त्रीय गायक असलेल्या विठ्ठलरावांनी गायनाबरोबरच सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, गंगूबाई हनगल, भीमसेन जोशी अशा किराणा घराण्याच्या गायकांना समरसून साथ केलीच, शिवाय कुमार गंधर्व, सिद्धेश्वरी देवी, अझमत हुसेन खाँ, मल्लिकार्जुन मन्सूर अशा ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर घराण्याच्या कलाकारांनाही ते तेवढीच रोचक संगत करत असत. `गाथा एक विठ्ठलाची!` या पुस्तकाची पहिली आवृत्ती २००१ मध्ये प्रकाशित झालेली असून या दुसऱ्या आवृत्तीचे आणखी एक अतिशय महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या आवृत्तीत संगीतसूर्य पंडित कुमार गंधर्व यांच्या सहवासातील पंडित सरदेशमुख यांच्या आठवणींची ६० पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत, ज्यामधून पंडित कुमार गंधर्व यांच्या पुण्यात झालेल्या पहिल्या मैफिलीपासून, त्यांनी निर्मिलेले राग, त्याबाबतचा त्यांचा विचार, गायनामध्ये तानपुऱ्याचे त्यांना असलेले महत्व, त्याबाबतचा सखोल विचार आणि त्यांच्या अनेक संस्मरणीय मैफिली यांचे वर्णन आहे. संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक, विद्यार्थ्यांबरोबरच उत्तम संगीतावर प्रेम असलेल्या प्रत्येक संगीतप्रेमीसाठी या पुस्तकाचे वाचन हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे.