Summary of the Book
लेखन, अभिनय, संगीतादी कला, वक्तृत्व अशा अनेक प्रांतात स्वच्छंद संचार करणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्याकडे मैत्रीची श्रीमंतीही भरपूर होती. या समृद्धीलाच त्यांनी या पुस्तकात शब्दबध्द केले आहे. केसरबाई केरकर, नानासाहेब गोरे, पंडित विष्णू दिगंबर, खानोलकर, गौरकिशोर घोष, शाहूमहाराज, माटे मास्तर, दादा धर्माधिकारी, ज्योत्स्ना भोळे,
तसेच मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, वसंत सबनीस, अशा अनेक थोरांशी जुळलेल्या स्नेहातून, आपुलकीतून हे सुंदर शब्द उमटले आहेत. या भावबंधामधून व्यक्तीमत्व उभी राहिली आहेत. या व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्ये, गुण, त्यांच्या कलेची महती, कामावरील- साहित्य-कलेवरील श्रद्धा यांचा वेधही पुलंनी घेतला आहे.
पु.लं. च्या पूर्वप्रकाशित निवडक लेखांचा संग्रह म्हणजेच ‘मैत्र’....
‘मैत्र’ पुस्तक भाई म्हणजेच पु.ल. यांनी विषयाचा अनुसरुन त्याचे मित्र ‘नंदू नारळकर’, ‘मनू गर्दे’, ‘दत्तू गर्दे’ यांच्या मैत्रीला अर्पण केले आहे.
सदर पुस्तकात समाविष्ट लेख :
* केसरबाई : एका तेज:पुंज स्वराचा अस्त (महाराष्ट्र टाईम्स, २५ सप्टेंबर १९७७)
* नानासाहेब गोरे : प्रफुल्ल होवोनि सुपुष्प ठेलें (महाराष्ट्र टाइम्स, १३ जून १९८२)
* पंडित विष्णु दिगंबर (सत्यकथा, सप्टेंबर १९७२)
* खानोलकरचे देणे (सत्यकथा, ऑगस्ट १९७६)
* गौरकिशोर घोष (सुगंध, १९७७)
* शाहूमहाराज : एक धिप्पाड माणूस (राजर्षी शाहू गौरव ग्रंथ, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग १९७६)
* माटे मास्तर (महाराष्ट्र टाइम्स, ३१ ऑगस्ट १९८६)
* हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार (महाराष्ट्र टाइम्स, १५ मे १९७७)
* जीवन त्यांना कळलें हो (महाराष्ट्र टाइम्स, २५ नोव्हेंबर १९८४)
* दादा धमार्धिकारी (साधना, १७ जून १९७८)
* शरदाचे चांदणे (महाराष्ट्र टाइम्स, २७ एप्रिल १९८६)
* ज्योत्स्ना भोळे नावाची माझी एक बालमैत्रीण (संगीत-कला-विहार, एप्रिल १९७५)
* रामकिंकरदा (महाराष्ट्र टाइम्स, वार्षिक १९८०)
* सखे-सोबती गेले पुढती (हंस, मार्च १९७८)
* मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष (सत्यकथा, जुलै १९६३)
* स्नेहधर्मी वसंत सबनीस (महाराष्ट्र टाइम्स, २७ डिसेंबर १९८७)
* स्थानबध्द वुडहाऊस (सुगंध, १९७६)
* जाने क्यूं आज तेरे नाम पे रोना आया (मौज, दिवाळी १९७९)