Hard Copy Price:
25% OFF R 180R 135
/ $
1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Too good. A must read. Few incidents might not be relevant in today's was of life, but the essence still stands tall. Similar acceptance problems persists, same emotions felt, only that reaction might be different.
This book is a nice portrayal of all 5-6 important characters; with positives and negatives of their characteristics.
Btw, Sorry for review in English. I do not have Marathi key board.
Nikhil Asawadekar
02 Sep 2017 12 00 AM
कोबाल्ट ब्लू.. आपलं अस्तित्व अबाधित ठेवून, सरळ आकाशाशी, त्याच्या व्याप्तीशी सलगी करणारा हा रंग. कोबाल्ट ब्लू चा ‘हिरो‘ ही तसाच आहे.. तनय आणि अनुजासाठी पूर्णत्वाची ओळख घेऊन आलेला, चेतना जागवणारा, प्रेमाची ओळख करून देणारा, आकाशासारखा सगळीकडे सामावलेला..
तनय आणि अनुजा ह्या दोन सिबलिंग्जची ओळख ‘कोबाल्ट ब्लू‘ मुळे अर्थात ह्या तिसऱ्या निनावी हिरोमुळे आपल्याला होत जाते.
ह्या नायकामुळे दोन भावंडांच्या आयुष्यात काय काय होतं आणि ही दोघं ह्या बदलाकडे कशा नजरेने बघतात ह्याची कथा म्हणजेच ‘कोबाल्ट ब्लू‘. बहीण–भाऊ म्हणून एकमेकांमध्ये आपुलकी असली तरी दोघंही एकमेकांच्या पर्सनल आयुष्यात काय चालुए या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. आई–वडीलही अगदी ‘ट्रॅडीशनल‘ विचारसरणीतले! त्यामुळे घरच्यांपाशी व्यक्त होण्याला खूप मर्यादा आहेत. ह्या दोघांच्या आयुष्याच्या कॅनव्हासवरचं त्यांचं हक्काचं स्वत:चं चित्र काही कारणांनी विस्कटतंय ह्याची स्वतंत्ररित्या जाणीव दोघांनाही आहे आणि नवा कॅनव्हास घेऊन पुढे जाण्याची.. त्यावर नवं चित्र रंगवण्याची उमेद दोघंही बाळगून आहेत.
Abhay Salvi
30 Jun 2017 07 49 PM
ही ९० पानी कादंबरी लांबीरुंदीने सिनेमा इतकीच, मात्र तरीही हा स्क्रीनप्ले नाही. ही प्रॉपर कादंबरीच, कारण यात मनातलं ‘वाटणं’ सर्वात महत्वाचं आहे, घटने पेक्षा. तसं म्हटलं तर इथे एकंच घटना घडली आहे आणि जी अगदी सुरुवातीलाच आपल्याला सांगितली जाते. कादंबरी दोन भागात विभागलेली आहे. पहिल्या भागात तनय नरेटर असतो तर दुसऱ्या भागात अनुजा. दोघांचं व्यक्त होणं हे त्यांच्या गुणधर्मानुसार आहे! तेव्हा तनय वाचनाची आवड असलेला, तसा इंट्रोवर्ट आणि अनुजा टॉम बॉयीश, ट्रेकिंग ला वगैरे जाणारी. तनय चा भाग हा निव्वळ अवाक करणारा आहे. त्याच्या प्रिय व्यक्तीबद्दलचा रोमँटीसिजम आपल्याला त्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पाडतोच. अनुजा तनय सारखी व्यक्त होत नाही, ती अधिक जमिनीवर राहणारी. मात्र इथे घडलेल्या घटने संदर्भात ती अधिक महत्त्वाची आहे. कादंबरी ला सुरुवात आहे, पण मध्य किंवा शेवट नाही. ते निर्माण करण्याचा लेखकाचा इंटेनशनंच नाही, हे फ्रीडम लेखकाला कादंबरी हेच फॉर्म देऊ शकत असावं. अर्थात हे फ्रीडम पुरेपूर एक्स्प्लोर करणं साधं काम नाही. कुंडलकर ने हे फ्रीडम सुंदर रित्या एक्स्प्लोर केलंय. भाषा ही सहज पोहोचणारी, आणि आजची आहे.
Abhiram
26 Aug 2016 03 55 PM
Masterpiece by Sachin Kundalkar... Niwwal Apratim... !
akshay deshmukh
27 Sep 2014 11 16 AM
nice book कोबाल्ट ब्लू mi vachal khup chan ahe .........