Home
>
Books
>
वैचारिक, साहित्य आणि समीक्षा, अनुवादित
>
Ayodhyecha Ravan Ani Lankecha Ram Ram Ani Ravan Hyanchya Vaicharik Sah Astittvachi Abhinav Purankatha - अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम राम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सह अस्तित्वाची अभिनव पुराणकथा
अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम
राम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सह अस्तित्वाची अभिनव पुराणकथा
AnuvaditAyodhyecha Ravan Aani Lankecha RaamAyodhyecha Ravan Aani Lankecha RamAyodhyecha Ravan Ani Lankecha RamAyodhyecha Rawan Aani Lankecha RaamAyodhyecha Rawan Aani Lankecha RamAyodhyecha Rawan Ani Lankecha RamCriticismDinkar JoshiIdeologicalLiterature And ReviewMehata PublicationMehata Publishing HouseMehta PublishingMehta Publishing HouseRam Aani Ravan Hyanchya Vaicharik Sah Astittvachi Abhinav PurankathaSushama ShaligramSushma ShaligramTranslatedTranslationVaicharikअनुवादितअयोध्येचा रावण आणि लंकेचा रामदिनकर जोशीदिनकर जोषीमेहता पब्लिशिंग हाऊसराम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सह अस्तित्वाची अभिनव पुराणकथावैचारिकसुषमा शाळिग्रामसाहित्य आणि समीक्षा
Hard Copy Price:
25% OFF R 240R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
रामकथेच्या नावाने आजमितीला वेगवेगळ्या भाषांत, वेगवेगळ्या प्रदेशांत आणि वेगवेगळ्या धर्मात मिळून सुमारे तीनेकशे रामायणे उपलब्ध आहेत, असा अंदाज आहे. सोळाव्या वर्षी रामाला वैराग्य येते, राम गृहत्याग करतो, वनवासी होतो आणि नंतर कुलगुरू वसिष्ठ त्याची समजूत घालून, त्याला उपदेश करून जीवनाचा अर्थ समजावून देतात अशी कथा आपल्याकडे प्रसिद्ध म्हणता येईल अशा योगवसिष्ठ रामायणात आहे. कृष्णाच्या रासलीलेने अत्यंत भारावून गेलेल्या लेखणीबहाद्दरांनी रासलीला करणारा रामही रंगवायला कमी केलेले नाही. रामायणाच्या नावाखाली हे सगळे चालत आले आहे. पुढे जाता, ललित साहित्य म्हटले जातील असे अनेक असामान्य कायात्मक ग्रंथही लिहिले गेले आहेत. भवभूती आणि कालिदासही त्यातच आले.
"समग्र रामकथा हीच मुळात निव्वळ पुराणकथा आहे, यात सत्याचा लवलेश नाही, असा कोणी राम कधी झालाच नहता आणि अयोध्या म्हणजे उत्तर प्रदेशातील गाव नाहीच, जावा बेटावरचे जोग्या नावाचे ते एक नगर आहे, थायलंडमधील अयुथ्या (अयोध्या) नावाचे गाव हीच रामजन्मभूमी आहे...' असली विधाने "पुराव्यांनिशी' करणारेही कमी नाहीत. रामकथा तपासून, पडताळून पाहणे हा प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश नाहीच. वाल्मीकींची मूळ रामकथा हा माझ्यापुढचा आदर्श आहे. मूळ रामकथेच्या पात्रांची, तिच्या कथानकाची ह्यात भले पुष्टी झाली नसेल, निष्ठापूर्वक समर्थनही नसेल, क्वचित कुठे तिच्यावर नगण्य जुलूम झाला असेल, पण तरीसुद्धा कुठेही कृत्रिम विरोधाभास वाटू नये अशा अकृत्रिम सहजतेने ह्या कथेचे विणकाम करण्याचा हा निष्ठापूर्वक केलेला प्रयास आहे.
राम आणि रावण यांच्याबद्दलच्या अनेक कथा वेगवेगळ्या प्रदेशात आणि विविध भाषांत सांगितल्या जातात. प्रत्येक कथेत स्थानिक संदर्भ जोडले जातात. त्याचबरोबर त्या त्या कथांमध्ये दोघांबाबतचे वर्णनही वेगळे असते. अनेक दावे आणि प्रतिदावे हे कथाकार करत असतात. दिनकर जोशी यांनी वाल्मीकी रामायणाचा आधार घेत इथे ही रामकथा लिहिली आहे. राम आणि रावण यांच्याबद्दलच्या विविध कथांचा वेध घेत या पुस्तकात जी मांडणी केली आहे ती वाचनीय झाली आहे. जोशी यांनी गुजराथीत लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी केला आहे.
One of the best book to read, this book learn me about how dashanan character build-up how past things changes him his dedication towards rakshas community and so much best book to read