Summary of the Book
माध्यमांचे क्षितीज १९९० च्या दशकात विस्तारले. दूरदर्शनबरोबरच इतर वाहिन्याही घराघरांत दाखल झाल्या. टीव्ही, जर्नालीझमच्या
ग्लॅमरचे आकर्षण वाढू लागले. पण यामागचे तंत्रज्ञान, मनुष्यबळ याची व्याप्ती किती असते, याची माहिती अनेकांना नसते.
तेथे काम करणारे पत्रकार, व्यवस्थापन वर्ग, कुशल तंत्रज्ञ, त्यांना आवश्यकप्रशिक्षण या सर्वांचा विचार करून डॉ. केशव साठ्ये यांनी 'टेलिव्हिजन आणि प्रसारमाध्यमे' मधून मार्गदर्शन केले आहे.
टीव्हीचा इतिहास, दृश्य ध्वनीची भाषा, बातम्यांचे महत्व, मुलाखतीचे तंत्र माहितीपट, लघुपट, शैक्षणिक दूरचित्रवाणी, रिअँलिटी शो, जाहिरात विश्व अशा दूरचित्रवाहिन्यांनवरील विविश अंगाचा विचार यात केला आहे. प्रसारमाध्यम विषय शिकणाऱ्या, तेथे काम
करणाऱ्यांना हे पुस्तक दिशादर्शक आहे. सामान्य वाचकांना या क्षेत्राची विस्तृत माहिती मिळते.