Summary of the Book
"स्वप्नांना पंख आभाळाचे .. पंखाचे स्वप्न आभाळ होण्याचे,' "वाट इतकी सरळ की तिला वळणाचीच भुरळ' अशासारखी मार्मिक टिप्पणी करणाऱ्या सदराचे हे पुस्तक. यातील अनेक ओळी वाचल्या, की मन प्रसन्न होते. आपल्या नकळत त्या वाक्यांना दाद दिली जाते. अनेक वर्षांपूर्वी व. पु. काळे यांचं वपूर्झा हे पुस्तक प्रसिद्ध झालं होतं. त्या पुस्तकाची आठवण हे पुस्तक करून देतं. दैनंदिन जीवनातील अनेक घडामोडींवर केलेली मार्मिक टिप्पणी इतकंच याचं मूल्य नाही. कमीत कमी शब्दांत मोठा आशय कसा सांगता येतो, हे या पुस्तकातून कळतं. काळाचं बंधन आणि अनुक्रमाणिकेची गरज नसलेलं हे पुस्तक एकाच वेळी आनंददायी आणि अंतर्मुख करायला लावतं.