Summary of the Book
विविध विनोदी लेख आणि काही विशिष्ट सवयी आणि लकबी असलेल्या व्यक्तींची विनोदी अंगानं रेखाटलेली नेमकी व्यक्तिचितत्रं ही या जनार्दन दातार यांनी लिहिलेल्या पुस्तकाची बलस्थानं आहेत. 34 लेख या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. दैनंदिन जीवनातील विसंगती मिस्कीलपणे टिपून, त्यावर चुरचुरीत टिप्पणी करणाऱ्या काही लेखांनी मजा येते. यातील एका लेखातील साहेबरावचं पात्र वाचकांची दाद मिळवेल, असं रंगलं आहे.