Summary of the Book
जावडेकरांची कथा वाचनीय असते. त्यांच्या कथांमध्ये मानवी भावभावनाचे हळुवार चित्रण असते खरे, पण त्यात कलापूर्ण संयम असतो. ओशट भावुकता नसते, अरुण साधू यांनी सुबोध जावडेकर यांच्या कथांविषयी असे लिहून ठेवले आहे.
साधू यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेमुळे या पुस्तकातील कथा वाचायची उत्सुकता आणखी वाढते. या संग्रहात एकूण २२ विज्ञानकथा आहेत. या विज्ञानकथा असल्या तरी विज्ञानाच्या अतर्क्य करामती किंवा फॅन्टसी यांत दिसत नाही. या कथा वाचकांचे रंजन करतात, भविष्यकालीन समाजाचे चित्र रंगवतात आणि वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवतात. समकालीन समाजातील घटनांशी या कथांची नाळ जोडलेली आहे आणि वास्तवाचेही भान या कथांमध्ये आढळते.