Summary of the Book
रामानंद बिडकर महाराज यांचे श्रीकांत आंबेकर यानी लिहिलेले हे चरित्र आहे. महाराजांची वृत्ती बालपणापासूनच भक्तीमार्गाची होती. ते हनुमांचे उपासक होते. परिस्थितीमुळे त्यांनी सराफी व्यवसाय करण्यास सुरवात केली आणि लवकरच ते कुशल सराफ म्हणून नावारूपाला आले.
अक्कलकोट महाराजांची भेट झाल्यावर त्यांचे परिवर्तन झाले. 'किमया करणार नाही,' असे वचन त्यांनी स्वामी समर्थांना दिले होते. मात्र, एक शिष्य तयार करीन असे त्यांनी म्हटले होते. ते परिपूर्ण शिष्य म्हणजे बाबा महाराज सहस्त्रबुद्धे.
महाराजांच्या चमत्कारांचे काही अनुभवही भक्तांना आले आहेत. त्यांनी नर्मदा प्रदक्षिणाही केली होती. या प्रदक्षिणेत त्यांच्यावर ओढवलेल्या संकटांना ते धीराने सामोरे गेले. महाराजांचे वर्णन करणाऱ्या आरत्यांचा समावेशही पुस्तकात आहे.