Summary of the Book
दुर्गम भागात केलेल्या सफरीवर आधारित अभिषेक कुंभार यांनी लिहिलेल्या ही कादंबरी आहे. प्रसाद, समीर, सूरज, भूषण, पंकज, योगेश, युवराज आणि अभिषेक हे आठ तरुण लडाखला जायचं नक्की करतात. त्यांच्या वाटेत अनेक अडचणी येतात. सह्याद्रीत हिंडलेल्या या मुलांना हिमालयाचे सौंदर्य जसे अनुभवायला मिळते, तशीच येथील भाषा, दऱ्याखोऱ्यात, अवघड रस्ते, खाणे यांची ओळख होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे तेथील माणसे आणि त्यांची संस्कृती समजते. 'जगायला मिळणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. तसे अजूनही बरेच लोक फक्त श्वास घेत आहेत,' असे म्हणताना 'आयुष्याचा प्रवास वसूल जागा,' या भूमिकेतून केलेले हे लेखन आहे. या तरुणांच्या बेधडक आयुष्यासारखेच लेखनाची भाषा ही बेधडक आहे. या तरुणांच्या जगात सुरू असलेली खळबळ आणि मनोव्यापार त्यातून समोर येतो.
Abhijeet Dhumal
25/07/2018
फिरस्ते वाचायला सुरवात केली की चालू होणारा ६५०० किमी . चा प्रवास वाचन संपेपर्यंत जणू , आपणच त्या प्रवासाचा एक भाग आहोत अशी अनुभुति देणारं ,अखंड प्रवास लीलया आपलसं करणारं ,अनेक उत्साहित जीवांना फिरायला भाग पाडणारं आणि जणू त्याचसाठी रेखाटलेल अस ,ज़िंदा दिल लिखाण !.......
Deepak
05 Mar 2018 05 30 AM
खूपच भारी लिहिलंय अभिदादा..
कमी किमतीत, घरबसल्या लेह-लडाख फिरवून आणलत.
मीही तुमच्यातलाच एक असा वाटलं पुस्तक वाचताना..
मस्त जुळून आलाय सगळं एकदम.
प्रवासवर्णने ,प्रसंग, निसर्गाचे जसेच्या तसे चित्रण आणि दोस्तीच्या दुनियादारीतले न संपणारे अतरंगी किस्से यांनी खूप मज्जा आणली.Hats off..
असाच लिहीत राहा #शब्दसम्राट
uma jagdish
02 Aug 2018 05 30 AM
हसत खेळत होणाऱ्या प्रवासाला दिलेली इतिहासाची जोड. एकदम सुरेख जमलय सगळं
AAkash gawade
02 Jul 2018 05 30 AM
प्रवास हा फक्त आणि फक्त जिवलग मित्रांसोबत करावा याचीच अनुभूती या पुस्तकातून सादर केली आहे ,खरोखरच वाख्यण्याजोगेच असा हा प्रवास आणि तो मित्र परिवार👌👌
Amey Ghadge
02 Apr 2018 05 30 AM
अप्रतिम पर्यटन अनुभव आणि सोबतच इतिहासाचा तडका. एकदा तरी पुस्तक वाचावे अशे सुंदर लेखन. सुरेख अभिषेक (शब्दसम्राट)
Kirti
02 Mar 2018 05 30 AM
Book Milale, Ananda Jahala, Ya pustkaat Rekhatalela Journey atishay apratim asun pustak vachlyavar aapan swtha tthe aslayacha Feel Yeto
Omkar barawkar
28/01/2018
अप्रतिम पुस्तक आणि एकंदरीत प्रवास
Aditya Gaikwad
28/01/2018
अभी शेठ.....
खूप खूप छान पध्दतीने ट्रीपचे रूपांतर पुस्तकात लिहले आहे
अभिषेक कुंभार खरच अप्रतिम झालाय तुझं लिखाण 👌👌👌
आयुष्यात एकदा तरी लेह लडाख सफ़र जीवलग़ मित्रा सोबत करवी आणि त्या मध्ये येणारे सुखद आणि थरारक अनुभव लेखकाने असे मांडले की प्रत्येक वाचकाला सफ़रीचा अनुभव येईल
मनापासून आवडले पुस्तक. ८ जणांच्या प्रवासात मी देखील एक होते असेच वाटत होते.
Great
लेह लदाख पर्यटनावर आणि मित्रांसोबत जगलेल्या क्षणांवर सुंदर पुस्तक..
लेखकाने संपूर्ण लेह लदाख घरी बसून दाखवले.
धन्यवाद.