Summary of the Book
वास्तुशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करणारे मुकुंद काणे यांचे हे पुस्तक आहे. काळजी, अडचणी, अनारोग्य, अपुरे धन, नातेसंबंधातील तणाव, अपयश याची कारणे वास्तूतील अपूर्णतेत असतात, असे ते सांगतात आणि त्यावर उपायही सुचवतात. हे लेखन त्यांनी संवाद स्वरुपात केले आहे. अनेक किस्से, प्रसंग सांगून विषय स्पष्ट केला आहे. दहा दिशांप्रमाणे अकराव्या दिशेचा विचार ते या पुस्तकात मांडतात.
'आतली, आत्माचाराची अकरावी दिशा दोषमुक्त असणे महत्वाचे आहे,' 'घराच्या एकूण रचनेला पूरक व रचनेशी मिळती-जुळती वस्तू निवडली, तर जास्त चांगले,' 'विचित्र आकाराच्या गणेशप्रतिमा चांगली फळे देत नाहीत, असे अनुभव आहेत,' 'आपल्या वागण्याने, साधक, संत वृत्तीच्या आचरणाने दगड-विटांच्या वास्तूतील अनिष्ट रचनांचे अनिष्ट परिणाम टाळता येतात,' आदी सल्ले पानापानावर मिळतात.