Hard Copy Price:
26% OFF R 70R 52
/ $
0.67
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
कवयित्री लता गुठे यांचा 'चांदणबाग' हा बालकाव्यसंग्रह प्रकाशित होत असताना मनात आनंदाच्या लाटा उसळत आहेत. मुले आभासी जगात रमतात , वाचनात रस घेत नाहीत , असा मुलांवर आरोप होतो . पण मुलांसाठी विशेष साहित्य उपलब्ध नाही . ही तक्रार दूर करण्याचा मार्ग मोठ्यानीच शोधायला हवा , याची जाणीव असलेल्या लता गुंठे यांनी प्राप्त परिस्थितीवर उतारा शोधण्याचा सतत प्रयत्न करत आहेत . त्यांची 'बिनभिंतीची शाळा' हा बालकथासंग्रह वाचल्यापासून मला त्यांच्या शैलीची भुरळ पडली आणि शोधक नजरेने त्यांची निर्मिती जाणण्याचा मला छंद जडला . त्यांच्या कवितेतील संवेदनशील आणि तरलतेच्या मी प्रेमात पडले , असे म्हणणे अतिशोयोक्ती ठरणार नाही . अशा संवेदनशील कवयित्रीने मुलांसाठी कविता लिहिणे , हे मुलांचे भाग्याच ! 'चांदणबाग' या कवितेत चंद्रात ससा वा हरीण दिसणे , सोनपरीबरोबर आकाशात भटकंती करून चक्कर येणे नि पावसाच्या सरीसंगे वास्तवात कोसळणे केवळ अप्रतिम ! परीच्या रूपाच्या रोमांचक कल्पनेत रमलेल्या बाल जीवांना लागलेली आईच्या कुशीची ओढ लताला कळते . लाजाळूच्या फुलाशी केलेला तरल संवाद मनाला भुरळ घालतो . आईच्या वाढदिवसाची संवेदनशील कल्पना , चिकुबाई - मिकुबाईशी केलेला संवाद वाचताना मजा येते . उन्हात पडलेल्या पावसात निर्माण झालेल्या इंद्रधनुष्याचे कौतुक नि पावसातल्या सहलीची रोमांचक कल्पना मुलांचं भावविश्व साकारते . 'समजून घ्या रे'मधील रसाळ भाषेत केलेला उपदेश असो , गणपतीबाप्पाची कविता असो की हल्लीच्या शिक्षण प्रणालीत दप्तराच ओझ उचलायला लावून मुलांचं गाढव झाल्याची कटू जाणीव 'पक्षांचा गाव' या शेवटच्या कवितेपर्यंत कवयित्री मुलांच्या भावविश्वाशी समरस झाल्याची सातत्याने प्रचिती मिळते . वयाचे ज्येष्ठत्व जमेस धरून तिचे भविष्यातील सर्व प्रयंत्न यशस्वी होवोत आणि तिची भरारी आकांक्षापुढती गगन ठेंगणे सिद्ध करो , असा आशीर्वाद देते.
बालसाहित्य लिहीण्याकडे लता गुठे ह्या लेखिका आणि कवयिञीचा नेहमीच कल राहीला आहे. इटुकले पिटूकले आणि बिनभिंतीची शाळा ह्या यशस्वी बालसाहित्यानंतर चांदणबाग हा अजून एक आकर्षक व वाचनीय कवितासंग्रह त्यांनी लहान मुलांच्या हातात दिला आहे, तो मुलांना नक्की आवडेल असाच आहे. खूप खूप शुभेच्छा 👌👍
प्रशांत राऊत, विलेपार्ले, मुंबई