Summary of the Book
संस्कार म्हणजे सुधारणे. चांगल्या गोष्टी ग्रहण करणे. एखादे बीज रुजवितानाही त्याच्यावर अनेक संस्कार केले जातात. मग, अपत्यरूपी बीजावर तर किती संस्कार करावे लागतील? अशा शब्दात डॉ शारदा निर्मळ - महाडुंळे यांनी आयुर्वेदीय बालसंस्कारांचे महत्व सांगितले आहे. या पुस्तकात अपुऱ्या दिवसांच्या बाळापासून ते नवजात बाळाची काळजी, बाळगुटी यांची माहिती आहे.
केवळ लहान बळांचाच विचार न करता बाळाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय यांची सांगोपांग चर्चा पुस्तकात केली आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा अतिरेक, स्थौल्य, किशोरवयीन मुलांमधील बंडखोरी, व्यक्तिमत्व विकास यांचाही विचार करण्यात आला आहे. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून मुलांसाठी उत्तम जीवनशैली विकसित करता येऊ शकते, याची माहिती पुस्तकातून मिळते.