Summary of the Book
महिला स्वतःच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाही, असे चित्र सर्वत्र दिसते. महिलांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. तसा प्रयत्न डॉ. शारदा निर्मळ - महांडूळे यांनी 'आरोग्य सखी'मधून केला आहे. शास्त्रशुद्ध, पण महिलांना समजेल अश्या भाषेत त्यांनी स्त्री आरोग्याविषयी माहिती दिली आहे.
स्त्रीच्या शरीराची रचना, नवजात बालिकेचा आहार, शाळेतील मुलींचा आहार, बाळांचे स्नान, मुलींचा व्यायाम आदी गोष्टी कशा कराव्यात, मासिक पाळी, शरीरात होणारे बदल, तारुण्यावस्थेत पालकांची जबाबदारी, विवाहापूर्वी वधू-वरांनी एकमेकांच्या आरोग्याची माहिती करून घेणे, संततीप्रतिबंधक उपाय, गर्भधारणेपूर्वी, गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी, प्रसूतीनंतरचे आरोग्य,
वंध्यत्वाची कारणे, उपाय, रक्तक्षय, श्वेतपदर, लघवीचे आजार व उपाय, कर्करोग, स्तनांचे आरोग्य व समस्या, रजोनिवृत्ती, नैराश्य, थायरॉईड, हाडांची झीज, मुळव्याध, लठ्ठपणा हृदयरोग, मधुमेह, एड्स आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. तसेच चाळीशीनंतरही तारुण्य कसे टिकवता येते, आरोग्यपूर्ण म्हातारपण, काही आजारांवर घरगुती उपाय हेही यात सांगितले आहे.