Summary of the Book
माणूस जगतो म्हणजे काय करतो ? तर जन्मल्यापासून जगात काही नाती तयार करत जातो. ती नाती आपल्या औकातीनुसार पाळत जातो. नात्यांचे गुंते वाढवत जातो. त्या गुंत्यांमध्ये गुरफटत जातो. कधी सुखी होतो, कधी दु:खी होतो. प्रश्न पडतो, माणूस नाती पाळतो म्हणजे काय करतो? माणसाला नाती असण्याचा उपयोग काय ? माणसाला नाती नसण्याचा उपयोग काय ? प्रत्येक नात्याची एक गाठ माणसाच्या मनात तयार होते. असंख्य नाती, असंख्य गाठी. अशा असंख्य गाठींचाच माणसाचा जीव होतो. त्या गाठीगाठींच्या पसार्यात स्वत:चा जीव कुठे राहतो ?