Summary of the Book
देशाचे रक्षण करणाऱ्या सौनिकांची आपल्याला केवळ काही विशिष्ट प्रसंगीच आठवण येते, पण ते सदैव जागरूक राहून आपली कामगिरी चोख बजावत असतात. देशाच्या संरक्षणासाठी प्रसंगी आपल्या प्राणांचीही बाजी लावतात. अशाच शूर सौनिकांच्या शौर्यगाथा या पुस्तकात वाचायला मिळतात.
अनुराधा गोरे यांनी अनेकांशी बोलून, भेटून हे लेखन केले आहे. यांतून युद्ध, संघर्ष आणि त्याचबरोबर मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचेही दर्शन घडते. काही अनुभव वैयक्तिक स्वरूपाचे आहेत, तर काही अनुभव युनिट अथवा बटालियनविषयीचे आहेत. मोहिमेची आखणी, या मोहिमेतील सहभागी, प्रत्यक्ष युद्धाचा थरार, सैनिकांनी दाखवलेले शौर्य याचबरोबर कठीण परिस्थिती, संकटे, प्रतिकूल हवामान आदींबद्दलही वाचायला मिळते.