Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/
$
0.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
रूपककथा हा साहित्य-प्रकार काव्याशी फार मिळता-जुळता आहे. थोड्या, परंतु लयबद्ध शब्दांनी वातावरण उत्पन्न करायचे, वेचक पण चमत्कृतिजनक अशा कल्पनांनी सौंदर्य खुलवायचे आणि हे साधीत असतानाच विचार आणि भावना यांना आवाहन करून वाचकाला ख-याखु-या जीवनाचा व जीवनमूल्यांचा साक्षात्कार उत्कटतेने घडवायचा, हा रूपककथेमागचा मूलस्त्रोत असतो. .... आतापर्यंत मी जवळजवळ चाळीस रूपककथा लिहिल्या असतील. निरनिराळ्या दृष्टींनी वाचनीय वाटणा-या त्यांतल्या काही निवडक कथांचा संग्रह. या सा-याच कथा अगदी माझ्या मनासारख्या उतरल्या आहेत, असे नाही; मूळ कल्पना आकर्षक असली, तरी तिचे सुंदर रूपककथेत रूपांतर करणे हे काम सकृतदर्शनी दिसते, तितके सोपे नाही. हस्तिदंताचा छोटा ताजमहाल करायला काही कमी कौशल्य लागते का ? नाट्यछटा, व्यक्तिचित्र, लघुनिबंध यांच्यासारखाच रूपककथा हा आकाराने लहान, पण रंगत साधायला अवघड असा वाङ्मयप्रकार आहे; आणि तो साहित्याच्या सौंदर्यात आणि सामर्थ्यात नि:संशयपणे मौलिक भर घालीत असतो. माझ्या वाचकांना या रूपककथा निश्चितपणे आवडतील, असा मला विश्वास वाटतो.