Summary of the Book
सुप्रिया दीक्षित व प्रकाश नारायण संत यांच्यातील बालपणातील मैत्रीचे रुपांतर तारुण्यात प्रीतीत झाले. सर्वसंमतीने विवाह झाल्यावर त्यांचे सहचर समाधानी, सुखी झाले. दोघेही उच्चविद्याविभूषित व घरचीमंडळीही सर्वांना समजून घेणारी, पूर्वीपासूनघरोबा असणारी. प्रकाश यांच्या आई म्हणजे कवियत्री इंदिरासंत. स्वतः प्रकाश हेही अध्यापनाबरोबरच साहित्य, कला, संगीतात रुची असणारे.
सुप्रिया या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरतकाम, संगीत अशा विविध कलांमध्ये पारंगत. त्यामुळे त्यांचे धागे एकमेकांमध्ये घट्ट विणीने गुंफलेले. पण प्रकाश संत यांच्या निधनानंतर डॉ. दीक्षित यांना एक पोकळी जाणवू लागते.पदोपदी आठवणींचा कढ येत रहातो. या सर्वांचे चित्रण त्यांनी 'अमलताश' मध्ये केले आहे. पती, सासुबाई, मुले, माहेरची प्रेमाची माणसे यांचे दर्शन होते. इंदिराबाईंच्या व्यक्तीमत्वाचे रंग यातून दिसतात. पती- पत्नीच्या सहजीवनाचे उत्कट चित्रण करणारी ही आत्मकथा एका आदर्श कुटुंबाची कहाणी आहे.