Summary of the Book
वेगवेगळे खाण्याची हौस केवळ मोठ्यांना असते, तशी मुलांनाही असते. मुलांच्या वाढत्या वयात त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला देताना त्यातून त्यांना उरेल अशी ऊर्जा मिळेल आणि एकूणच आरोग्यासाठी ते पोषक असेल, याकडे लक्ष द्यायला हवे. कांचन बापट यांनी या पुस्तकात मुलांना आवडतील अशा पौष्टिक पदार्थांच्या पाककृती सांगितल्या आहेत. तयार पोळीपासूनही विविध पदार्थ बनवता येतात, हे या पुस्तकातून समजते.
अप्पे, इडली, डोसे, उत्तप्पा, पराठे, पोहे, ब्रेड, भात यांपासून करता येणारे कितीतरी पदार्थ पुस्तकात दिले आहेत. कटलेटचे प्रकार, रोल्स, रॅप, फ्रीटर्स, भजी, पकोडे, धिरड्याचे प्रकार, केकचे विविध प्रकार पुस्तकात समाविष्ट आहेत. नेहमीच्या ढोकळयासह अन्य प्रकार, टिकाऊ पदार्थ यांसह लाल भोपळ्याचे पदार्थ, तसेच मक्याच्या पदार्थांच्या पाककृती पुस्तकात दिल्या आहेत.