Summary of the Book
मनोविकाराबाबत समाजाचा दृष्टीकोन अजूनही 'वेडे'पणाचा आहे. मनोविकारग्रस्त म्हणजे 'वेडे' असेच लोकांना वाटत असते. पण शरीराप्रमाणे मनाचे आजारही असतात आणि ते योग्य औषधोपचार, मार्गदर्शन यामुळे बरे होऊ शकतात, हेही आता समजू लागले आहे.
रुग्ण, त्याचे कुटुंब, नातेवाईक व एकूणच समाज यांचा दृष्टीकोन बदलण्याचे कार्य मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी करीत आहेत. मनोविकाराबाबत जागृती करणे, मनोविकारग्रस्तांवर उपचार करून त्यांना पुन्हा उभे करणे, माणसांना ताणतणाव झेलण्यास समर्थ करणे हे डॉक्टरांचे अथक कार्य हे २० वर्षांपासून सुरु आहे.
'इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ' च्या (आयपीएच ) माध्यमातून त्यांचे काम सुरु आहे. याचा प्रवास त्यांनी 'शहाण्यांच्या सायकिअॅट्रिस्ट'मधून कथन केला आहे. एम. बी. बी. एस नंतर मनोविकारशास्त्रामध्ये एम. डी. साठी सायकिअॅट्री विषय घेण्यापासून ही कहाणी सुरु होते.
मग स्वतःचे क्लिनिक, विविध परिषदा, आयपीएचची उभारणी, रुग्णांची तपासणी, जनजागृतीचे काम, मित्र - मैत्रिणी, सहकाऱ्यांचा पाठिंबा, मनोविकारग्रस्तांबरोबरच व्यसनमुक्ती, क्रीडामानसशास्त्रातील काम, लेखन, नाट्य, संगीत असे त्यांचे छंद, अनुभव, विविध प्रयोग या बाबत त्यांनी सांगितले आहे.