Summary of the Book
बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व ऍडव्होकेट के. बी. हन्नुरकर यांनी वकिली व्यवसायात आलेल्या अनुभवांना शब्दरूप दिले आहे. न्यायालयीन कामकाजाचे ज्ञान नसलेली मंडळी, त्यातून त्यांची होणारी फसवणूक, तसेच गरिबी व अज्ञानातून काही मंडळींवर आलेली संकटे, या साऱ्या प्रसंगांना त्यांनी कथारूप दिले आहे. छोट्या छोट्या अशा पंधरा कथांचा हा संग्रह कधी हसू फुलवतो तर कधी डोळ्यांत पाणी आणतो, तर कथानायकाची होणारी अवस्था पाहून चीड आणतो. लेखकांचे हे पहिलेच पुस्तक असून, लेखनात नवखेपणा जाणवत नाही.