Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/ $
2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
या विनोदी कथासासंग्रहातील कथा प्रामुख्याने कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या आहेत. विशेषतः नायिका-प्रधान आहेत. रोजच्या जीवनामधल्या गमतीदार प्रसंगातून, माणसांच्या टोकाच्या वर्तणुकीतून, विक्षिप्त छंदामधून आणि कठीण प्रसंगांमाधूनही या कथांमध्ये विनोदनिर्मिती करण्यात लेखिकेने यश मिळविले आहे. हलकी-फुलकी, सहजसोपी लेखनशैली , संवादपूर्ण भाषा, व्यक्तिरेखा साकार करण्याचे सामर्थ्य, मानवी स्वभावाचे विविध पैलू त्यांच्या कथांमधून कलात्मकतेने उमटतात. मानवाच्या शारिरीक वैगुण्यांवर वोट ठेवून केलेला उथळ विनोद या कथांमध्ये नाही. या कथांमधील व्यक्तिरेखा सुशिक्षित आहेत, सुसंकृत आहेत, शहरी वातावरणात वाढलेल्या आहेत. तरीही क्वचित भलत्या-सलत्या गोष्टींच्या आहारी जाऊन विनोदाचं कारण बनतात. उदार मतवादी असूनही क्वचित कोत्या मनोवृत्तीचं दर्शन घडवतात. क्वचित पुरुषप्रधान संस्कृतीचं दर्शनही कथांमध्ये घडतं अश्लील विनोदाचा पुसटसा स्पर्शही या कथांमध्ये नाही.तरीही या कथा आपल्याला हसवतात. कधी स्मितहास्य करवतात, तर कधी खळखळून हसवतात. या कथांमधील पात्रं आपल्याला ओळखीची वाटतात. कथांमध्ये भेटण्यापूर्वीही आपण त्यांना भेटलो आहोत अशी अनुभूती आपल्याला होत राहते. डॉ. सुमन नवलकर यांच्या या विनोदी कथा मराठी विनोदी कथेच्या विश्वात आपला वेगळा ठसा उमटवतात, यात शंका नाही.