Hard Copy Price:
25% OFF R 140R 105
/ $
1.35
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
स्त्रीमनाचे विविध पदर, विविध पैलू कलात्मकरित्या गुंफून वाचकाला स्त्रीजीवनाचे सर्वांगीण रहस्य तरलपणे समाजवणारा काव्य संग्रह.
किती सोशिक हि बाई
गंधवेल जाई जुई
टाका टाका सांधलेले
जणू सफेद रजई ...
या पहिल्या "देहमुठ " कवितेची सुरवात तुम्हाला मुठीत बंदिस्त करून स्त्री विश्वाकडे पाहायची नवी सहवेदना बहाल करते .
स्त्रीजीवनाच्या वेदना आणि बाईपणाचे लाभलेले वरदान या दोघांचा सुरेख गोफ कवितांमध्ये विणला आहे . स्त्रीवाचकांना हे पुस्तक स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टी देईलच पण पुरुष वाचकांनाही स्त्रीजीवनाच्या रस्त्याची गुहा खुली करून तिच्यातल्या खजिन्याची सफर घडवून आणेल. आणि प्रत्येकवेळी पुन्हा वाचतांना तुम्हाला कलेचे नवीन दालन खुले झाल्याचा आनंद देत राहील..एखाद्या कारंज्याप्रमाणे!
सुगंधा
22 Mar 2021 10 25 PM
या पुस्तकाच्या प्रत्येक पानात काही खास आहे जे कधी आपल्या मनाला भिडून जाते
Jitendra Panhalkar
22 Mar 2021 09 35 PM
देहमूठ पुस्तकातील काव्यरचना वाचलेत.. स्त्री मन व् समाजातील वावरणारी स्त्री...ह्यांचं सुरेख वर्णन विविध काव्यरचनेत केलं आहे. प्रत्येक पाणावर थोडया थोडक्या ओळी असल्या जरी एक वेगळा व खोल मनाला स्पर्श करणारी शब्दफेक..पुनः वाचकास विचार करण्यास भाग पडते .. नक्की वाचावे असे.....✍️
Dr s chavan
22 Mar 2021 02 06 PM
देहमुठ एक शब्द शिल्प आहे..स्त्रीच्या मनातील भावनांचे पदर उलगडणारे एक वास्तव..अनेक स्त्रियांच्या(स्त्री,आई,मुलगी,जोगतीन, डोंबरिन,कातकरी,अश्या अनेक) मनातील जाणिवेचे स्पंदन आहे ही देहमुठ..अष्टाक्षरीच्या काव्यछंदात डॉ पल्लवी यांनी कमाल केली आहे.. त्यांच्या सुबक लेखणीचा चमत्कार आहे ही देहमुठ.. प्रत्येकाने वाचावी अशी.