या पुस्तकात सुखी आयुष्याच्या प्रवासासाठी दिशादर्शक व आजार होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक तत्वे (पथ्ये ) दिलेली आहेत. शरीराचे व शरीरातल्या प्रत्येक अवयवांचे जीवनमान वाढवण्यासाठी जीवनशैलीत बदल, आहाराचे आरोग्यमंत्र, आरोग्यचे कटू सत्य, आपण स्वतः आजारांचा उगम कसा करतो किंवा घडवतो, चांगल्या कामांमधून अथवा क्रियांमधून वाईट अनुभव व परिणाम नकळत कसे होतात,
आहाराचा पौष्टिक दर्जा वाढवण्यासाठी सध्या व सोप्या गोष्टी, गर्भवती महिलांसाठी व लहान बाळांसाठी माहिती, धोक्याची वळणे, आजारांची प्रमुख करणे, लक्षणे, त्यांच्यासाठी प्रतिबंधात्मक तत्वे, शास्त्रोक्त पद्धतीचे व्यायाम, व्यायाम करताना घ्यावयाची काळजी, व्यायामाचे फायदे, कृती, दैनंदिन काम करतांना चूक व बरोबरच्या स्थिती, पवित्रा अशी मुद्देसूद शरीर स्वास्थाला उपकारक माहिती अगदी सोप्या भाषेत मांडलेली आहे.
‘हेल्थ सिक्रेट्स - रहस्य आरोग्याचे’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5390104472096829653