Summary of the Book
लहान मुलांच्या कल्पना शक्तीला चालना मिळेल, अशी चार छोट्याखानी इंग्रजी पुस्तके अॅक्टिव्हिटी बुक्स अंतर्गत येतात. फन विथ बर्ड्समध्ये साप-शिडीचा नव्या प्रकारच्या खेळाचा अंतर्भाव होतो. फन विथ पेट अॅनिमल्समध्ये लॉस्ट अँड फाउंड गेम, कोड, बोलणारे प्राणी, तर फन विथ फ्रुट्समध्ये कात्रीशिवाय हस्तकला शिकायला मिळते.
फन विथ व्हेइकल्समध्ये विविध प्रकारच्या वाहनांची मुलांना माहिती मिळते. सर्व पुस्तकांमध्ये मुलांना आवडतील अशी चित्रे रंगवायचा आनंद मिळतो.
'टिंगलू हत्ती आणि पिट्टू ससा' हे अरुंधती डांगे यांचे हे पुस्तक रंगरदार गोष्टींचे आहे. विशेषतः प्राण्यांच्या गोष्टी वाचायला मिळतात. शाळेत जाणारा टिंगलू हत्ती, प्राण्यांची सभा, जंगलसफारी, वाघाचे बछडे असे बरेच काही अनुभवायला मिळते.