Summary of the Book
जावेद अख्तर! हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारं, हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ठळकपणे, अमीटपणे उमटलेलं एक नाव. ज्यांच्या लेखणीच्या परीसस्पर्शाने शब्दांचं सोनं होतं, ज्यांच्या प्रतिभेच्या भरारीने आपण थक्क होऊन जातो असा हा प्रतिभावंत. त्यांचं आयुष्य म्हणजे जबरदस्त यशाची एक कहाणी असली तरी भूक, अपमान, उपेक्षा, अपयश, अशा दुखा:च्या असंख्य बाणांवर त्यांचं हे यश तोललं गेलं आहे. त्यांच्या आयुष्याने, त्यांच्या प्रियजनांनी दिलेल्या दुखा:च्या बाणांनी हा 'तरकश' (बाणांचा भाता) भरलेला आहे...
या कवितांमधलं वैविध्य, त्यातली आशयघनता, आणि आयुष्याच्या नवीन अर्थांचा शोध घेताना त्यांच्या प्रतिभेची दिसलेली झेप अक्षरशः थक्क करून जाते.