Summary of the Book
भारतातील ग्रामीण, आदिवासी भागातील लोकजीवनात नाट्य, संगीत, गायन याला मोठे महत्त्व आहे. रुढी, परंपरा, सण, उत्सव, कुलाचार आदी प्रसंगी अनेक कलाविष्कार सादर होत असतात. भारूड, गोंधळ, दशावतार, विदूषक, कथाकथन हे त्याचेच भाग आहेत. यामुळे रंजन तर घडतेच शिवाय प्रबोधनही घडते.
महाराष्ट्रातील लोकरंगभूमीचे निरनिराळे प्रकार, परप्रांतातील नाट्याविष्कार, त्यातील बदल व लोककलांचे भवितव्य याची माहिती ‘लोकरंगभूमी’ मधून डॉ. प्रभाकर मांडे यांनी दिली आहे.