Summary of the Book
आधुनिक तुर्कस्थानच इतकं जिवंत चित्र अगदी पहिल्यांदा आणि तेही मोठ्या हिमतीन स्नोमध्ये रेखाटण्यात आलेल आहे.
-न्यूयोर्क टाईमस
समकालीन जागतिक साहित्यावर आपल्या मोजक्याच ; पण दमदार लेखनाने ठसा उमटविणारा लेखक म्हणून ओरहान पामुकच नाव घेतले जाते.
त्यांची 'स्नो' ही कादंबरी आधुनिक तुर्कस्थानच्या अनेक प्रश्नांना भिडणारी कादंबरी आहे. सांस्कृतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उभी राहिलेली नायकाची जीवनकहाणी अशा मध्यवर्ती कथानकातून जरी 'स्नो' वाचकांसमोर येत असली , तरी पाश्चात्य संस्कृतीचा मूलतत्त्ववादी तुर्कीवर पडणारा प्रभाव आणि त्यामुळे तिथल्या परंपरावादी लोकांमध्ये निर्माण झालेला आक्रोश, पाश्चात्य संस्कृती नाकारत आपल सत्त्व टिकवून ठेवण्यासाठीची त्यांची धडपड आणि त्यातून निर्माण होणारे टोकाचे संघर्ष हे मुद्दे वैश्विक मनात ख-या अर्थाने भिडणारे आहेत .