Summary of the Book
मी फक्त स्वत:साठी लिहितो..
चूक..
कोणीतरी(तरी!) वाचावं म्हणूनच लिहितो..
लिखाण हा खरंतर माझा प्रांत नव्हे.. माझा व्यवसाय (धंदे??!) वेगळे आहेत..मी माझ्या उद्योगात बिझी असतो..
चूक..
काही बिझी बिझी नसतो. लिखाणासाठी पुष्कळ वेळ आणि लिखाणाची पुरेशी खाज असल्यानेच लिहितो..
चांगलं लिहिता आलं नाही तरी "खरं" लिहिणं आपल्या हातात आहेच..
ब्लोग फुकट असतो. पुस्तक विकत असतं. वाईट निघालं की नुकसान होतं.तुम्हाला हे पुस्तक "फायद्यात" पडो अशी सदिच्छा.