Summary of the Book
भूत - खेतं, चेटूक - चेटकीण यांच्या गोष्टी ऐकायला, वाचायला बहुतेकांना आवडते. सॅली ग्रीम यांनी चेटक्यांचे विश्व 'हाफबॅड' कादंबरीतून उलगडले आहे. कथानायक नाथन वायर्न आठ वर्षांचा असल्यापासून त्याचे चेटक्या बनण्याचे प्रशिक्षण सुरु होते.
दुष्ट काळा तांत्रिक मार्कस त्याचे वडील होते. नाथन मात्र सद्वर्तनी होता. चेटकिणींच्या जगातही गोरे, कृष्णवर्णीय, मिश्र असे वर्गीकरण केले जाते. जेसिका, डेबोरा आणि आरान ही त्याची सावत्र भावंडं. त्यानुसार नाथनची नोंद मिश्र जातीचा अशी होते. या सर्वांबरोबरच नाथनची आजी, आई, गॅब्रियल, मर्क्युरी, रोज अशा पात्रांमधून ही कथा पुढे सरकते.
फेअरबॉर्न चाकूचे रहस्य उत्कंठा वाढवते. चेटक्यांच्या जगातील चांगल्या व वाईट वृत्तीचे दर्शन घडविणारे ही कादंबरी वाचकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. याचा मराठी अनुवाद अजित ठाकरे यांनी केला आहे.