Summary of the Book
डॉ.बबन जोगदंड हे पुण्यातील महाराष्ट्र शासनाच्या 'यशदा'या शिखर प्रशिक्षण संस्थेत अधिकारी पदावर कार्यरत आहेत.त्यांचा अनेक सामाजिक,धार्मिक कार्यात मोठा सहभाग आहे .स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही ते सातत्याने मार्गदर्शन करतात.त्यांनी अनेक मासिके ,वर्तमानपत्रांच्यामाध्यमातूनही विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे.त्यांचा अनेक विषयांचा अभ्यास आहे.
विशेषतः फुले-आंबेडकरी चळवळीचे ते भाष्यकार आहेत.त्यांची आतापर्यंत दहाहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.पत्रकारितेत त्यांनी पीएचडी ही पदवी संपादन केली आहे.अनेक पुरस्कारांनेही ते सन्मानित असून त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे.त्यांच्यावर 'द किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग 'हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
हे पुस्तक महात्मा जोतिराव फुले यांनी शेतकरी वर्गासंबंधी मांडलेल्या विचारांवर आधारित असून हे संशोधात्मक स्वरूपाचे लेखन आहे.