Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
शत्रूचे हजारोंचे सैन्य असतानाही शिवाजी महाराजांचे 300 -४०० मावळे त्यांना जेरीस आणीत असत. हे शक्य होत असे ते शिवरायांना अवलंबिलेल्या गनिमी कावा या युध्तंत्राने. नियोजनबद्ध नियंत्रित हल्ले हे सूत्र असलेले हे युद्धतंत्र आणि त्याव्दारे महाराजांनी फत्ते केलेल्या मोहिमांची माहिती प्रा. नामदेवराव जाधव यांनी 'गनिमी कावा' या पुस्तकातून दिली आहे. गनिमी काव्याने लढण्याचा मुख्य हेतू, त्याचे नियोजन, उद्दिष्टे प्रथम विषद केली आहेत. मराठयांनी या युद्धतंत्राचा वापर केलेल्या प्रसंगांची जंत्री यात दिली आहे. शिवाजी महाराजांनी केलेली सैन्य रचना व व्यवस्थापन, गनिमी काव्यात राखली जाणारी शिस्त, गनिमी काव्यासाठी नैसर्गिक गोष्टी व पारीस्थितीचा महाराजांनी केलेला उपयोग, रणक्षेत्राची अचूक निवड याची माहिती दिली आहे. शिवरायांची पहिली लढाई, पहिला छापा, प्रतापगडाचा प्रसंग, उघड्या मैदानातील पहिली लढाई, पन्हाळ्याहून सुटका, उंबरखिंड, लालमहालातील पराक्रम, सुरतेवर चाल, पहिली आरमारी मोहिम अशा विविध मोहिमा, युद्ध व शत्रूला नामोहरम करण्याच्या रणनीतीबद्दल सांगितले आहे.
शिवाजी महाराजांचे युद्ध तंत्र म्हणजेच गनिमीकावा, कावा समजवण्या करिता इतिहासाची माहिती करवून घेणे अतिमहत्वाचे आहे. पुस्तकात अतिशय विस्तृत माहिती असल्याने कदाचित नुसत्या गनिमीकाव्यांची महिती घेणार्यांसाठी हे पुस्तक अजिबात नाही, परंतु शिवरायांचा अभ्यास करायचा असल्यास हे उत्तम पुस्तक आहे. लेखक -नामदेव रावांची प्रामाणिक मेहनत दिसून येते.
Shailesh Baban Raut
17 Aug 2015 10 20 AM
महाराजांचा गनिमी कावा कसा होता हे माहित करून घ्यायचे असेल तर प्रा. नामदेवराव जाधव यांचे हे पुस्तक वाचावे. गनिमी कावा वापरून प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करावी हे शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी दाखवून दिले.
जय शिवराय
Sujata Kurhade
10 Aug 2014 09 43 PM
The Great Maratha.
Ketan Vilas Paigude
30 Aug 2012 12 41 PM
mard maratha
MahaDev
19 Oct 2011 02 29 PM
New approach to this war strategy. Author has really taken it to far great height. Well supported by various examples.