Summary of the Book
आनंदाचे असोत वा दु:खाचे,
पापणीशी आलेले अश्रू
पुसू नयेत
किंवा अडवू नयेत
कधीच.
घरंगळू द्यावे त्यांना थेंब थेंब...
आपल्या पापण्यांवरून गालावर
अन गालावरून... मनावर.
आपल्या मनातल्या मनस्वी मोराला
बेभान होऊन नाचण्यासाठी
तेवढंच पाणी पुरेसं असतं!