पायखुटी
Out Of Print

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Book Review
Write a review

Gokul Bagul
19/03/2023

आदरणीय संजीव गिरासे सर , आज "पायखुटी" ही आपली ग्रामीण बोलीतील कादंबरी वाचून संपवली. पुस्तक खरंतर अहिराणी बोलीभाषा साठी एक दर्जेदार पुस्तक झालेले आहे. आपण "पायखुटी"मध्ये चित्रीत केलेले "नाना "हे व्यक्तिमत्व अत्यंत बेरकी, स्वाभिमानी , कष्टाळू जिद्दी हुशार असे व्यक्तिमत्व रेखाटलेला आहे ।खानदेशी ग्रामीण जीवनातील वास्तववादी, व्यक्तीचित्रणे यांत आलेली आहेत. तात्या असेल बापू अथवा सुभाष असेल असे एक एक व्यक्तिमत्व आपण यात त्यांच्या मूळ स्वभावासकट प्रगट केलेले असल्यामुळे आपण एखाद्या चित्रपटातील घटना पाहत आहोत. असा भास कादंबरी वाचताना क्षणोक्षणी होत असतो त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेतील अराजकता, उदासीनता, ग्रामीण शिक्षणा कडे शासनाचे असलेले दुर्लक्ष
Rekha kuwar
13/04/2020

डॉ. गिरासे यांची पायखुटी कादंबरी ग्रामिण भागातील वास्तव घेवून येते. या कादंबरीचा नायक शालंधर पाटील एक तत्वनिष्ठ व्यक्तिरेखा आहे. उच्च शिक्षणाची सोय खेडयात उपलब्ध नसल्याने व्यवसाय शिक्षण म्हणजेच ग्रामिण शेतकी भागात आवश्यक सेवा मोटर रिवायंडीग हा नायक स्विकारतो. मोटर रिवायंडीग करता करता मोटर खरेदी विक्री सुध्दा करतो. हे करत असतांना लहान भाऊ इबू गुरुजींच्या हलगर्जीपणा मूळे कॉलरशिपच्या परीक्षे पासून मूकतो. ‘ईबू’ या हुशार मुलाची स्कॉलरशिप परीक्षा शिक्षकांच्या निष्काळजीपणा मुळे हूकणे, चोर बाजारातील वस्तू खरेदीत फसणे, नाना वर इलेक्ट्रिक मोटर चोरीचा आरोप आणि त्यानंतर कोर्ट - कचेरी ला सामोरे जाणे, नानांनी इंजिनियर सारखे डोके वापरून तयार केलेली यंत्रे, छोट्या - मोठ्या कामांसाठी अशिक्षित लोकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध नानांची चीड आणि उपाय योजना अशा घटनांची सरमिसळ या कादंबरीत आहे. ग्रामीण भाषेतील काही शब्दांचे अर्थ शेवटी न देता कथानकाच्या प्रवाहात तिथल्या तिथे दिले आहेत. उदाहरणार्थ घडमाची म्हणजे जुन्या काळातलं घरातलं अंथरुण ठेवायचं साधन किंवा जुवास्नी भरसे कुणी नेसणं सोडून देतो का? असा दमदार बाज असलेली ही कादंबरी आह
ऋतुजा राजपूत
04 Nov 2020 05 30 AM

प्रादेशिक कादंबरी प्रकारात संजीव गिरासे यांची पाय खुटी ही कादंबरी महत्व पूर्ण ठरते. खानदेश हा प्रदेश साहित्यीक दृष्ट्या तसा दुर्लक्षित च म्हणावा लागेल. कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी खान्देशी बोलीचा प्रथम मुबलक प्रमाणात वापर केला आहे, त्यांच्या कवितेतून. खानदेश संस्कृती, परंपरा, सण, उत्सव यांचा परिचय महाराष्ट्र ला करून दिला. त्यानंतर भालचंद्र नेमाडे हे खानदेशात ले आहेत त्यांनी लेवा बोलीचा अल्प वापर केला आहे. रविंद्र पांढरे, अशोक कोळी, गोकुळ बागुल अशी ठराविक नावे घेता येईल की ज्यांनी कादंबरी लेखन केले आहे. संजीव गीरासे यांची पाय खूटी ही कादंबरी खानदेश चे उत्तम प्रतिनिधित्व करताना दिसते. प्रभावी निवेदन शैली व कथानक हे या कादंबरीचे प्रमुख बलस्थान आहे. ग्रामीण भागातील लोक, शेतकरी, राजकीय पक्ष नेते, पुढारी, शिक्षण व्यवस्था, पोलीस,सुशिक्षित बेरोजगार, पत्रकार,वकील, दुकानदार यांच्या वृत्ती प्रवृत्ती वर प्रभावी पणे प्रकाश टाकते. उत्कंठा शिगेला पोहोचली जाणारी लेखन व चित्र दर्शी शैली यांमुळे वाचकाला खिळवून ठेवण्यात लेखकसंजीव गिरसे कमालीचे यशस्वी ठरले आहेत. सुंदर वाचन आनंद मिळविण्यासाठी पाय खुटि या कादंबरी वाचली पाहिजे
दिनानाथ एम. पाटील, कल्याण.
17/03/2020

कादंबरीचा नायक म्हणजे शालंदर/नाना पाटील, खेडेगावातून जुनी मॅट्रिक पास झाल्यावर मुंबईत येऊन मोटार रिवाइंडिंग कोर्स पूर्ण करतो आणि फक्त तोच व्यवसाय न करता सामाजिक कार्य करत राहतो आणि त्यामुळे तो या कादंबरीचा हिरो आहे. हे संपूर्ण कथानक कुरूकवाडे, शिंदखेडा,दोंडाईचा परिसरातील असून अहिराणी या बोलीभाषेत आहे. ‘ईबू’ या हुशार मुलाची स्कॉलरशिप परीक्षा शिक्षकांच्या चुकीमुळे हूकणे,चोर बाजारातील वस्तू खरेदीत फसणे, नानावर इले. मोटर चोरीचा आरोप आणि त्यानंतर कोर्टकचेरी ला सामोरे जाणे,नानांनी इंजिनियर सारखे डोके वापरून तयार केलेली यंत्रे,छोट्या मोठ्या कामांसाठी अशिक्षित लोकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध नानांची चीड आणि उपाय योजना अशा घटना आहेत.कथानकाच्या अनुषंगाने समाजात घडणाऱ्या घटना निष्काळजीपणा,खोटेपणा, लाच देणे घेणे,दारू पिऊन धिंगाना घालणे,चोरी करणे, पैशापायी स्वत्व विकणे,शिक्षण क्षेत्रातील अपप्रवृत्ती, कर्मकांड, पोलीस खात्यातील गैरव्यवहार, राजकारणी मंडळीची खोटी आश्वासने,यावर प्रखरतेने प्रकाश टाकला आहे. कादंबरीत एक वाक्य आहे सत्य परेशान होता है पराजीत नहीं। अगदी या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना देणारे हे वाक्य आहे.
विजय भदाणे
03 Aug 2020 05 30 AM

पायखुटी ही ग्रामिण समाज व्यवस्थेवर प्रखड भाष्य करणारी कादंबरी आहे. ग्रामिण भागातिल राजकीय व्यक्तिंनी दोन व्यक्तिंमाधील संघर्षाला पेटवत ठेवून स्वतःचे डावपेच साधण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्याची चित्तरकथा श्री गिरासे यांनी प्रस्तुत कादंबरीत रेखाटले आहे. ठळक ग्रामिण व्यक्तिरेखा, वास्तवदर्शी लेखन शैली, वैशिष्टयपूर्ण ग्रामिण अहीराणी बोलीचा चफखल वापर वाचकाला भावतो. ग्रामिण जीवनशैलीचे खुमासदार नमुणे अत्यंत ताकदीने उभे केलेले आहेत. आहिराणी बोली व परिसर लेखनातून ताकदीने उभा केला आहे. आहिराणी बोलीभाषेचे वैशिष्य अभ्यासण्यासाठी सुद्धा ही कादंबरी मोलाची ठरेल, असा विश्वास वाटतो. कथावस्तुची मांडणी ओघवती झाल्याने बोलीभाषेचे काही शब्द कळले नाहीत तरी संदर्भाने त्या शब्दातील भाव बरोबर आपली कामगिरी करतात. त्यामूळे भाषेचा अडसर येत नाही. एकंदर एकदा वाचावी अशीच शेवट पर्यंत खिळवून ठेवणारी, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी ही कादंबरी आहे .
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat