Summary of the Book
गो. नी. दांडेकर यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेल्या या संस्कारकथा. लहान मुला-मुलींबरोबरच मोठ्यांनीही वाचाव्यात अशा. आईने मुलाला सांगाव्यात किंवा वाचून दाखवाव्यात अशा. आपल्या देशात राम, कृष्णाबरोबरच शिवरायांसारखे पराक्रमी राजे, तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्यासारखे संत, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे थोर सेनानी होऊन गेले. या थोर व्यक्तींच्या गोष्टी गो. नी. दांडेकर यांनी रसाळ, ओघवत्या भाषेत सांगितल्या आहेत. या एकूण ४२ कथांमध्ये साहस, पराक्रम, धैर्य, उदात्तता, चातुर्यम गुरुभक्ती, मातृ-पितृभक्ती, कर्तव्यपरायणता आदी गुणांचा समुच्चय दिसून येतो. सुबोध, सुलभ भाषा हे या काथांचं वैशिष्ट्य. हा उपदेश नाही, तर संवाद आहे. बोधप्रद प्रेरणा देणाऱ्या या कथा मोठ्यांनाही गुंतवून ठेवतात.