Summary of the Book
बार्शी शहरापासून जवळच असलेल्या माणकेश्वर या गावातील शिव आणि सटवाई या मंदिराचे संशोधन करून त्यावर नगर जिल्ह्यातील प्रा. नवनाथ शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिला. भावनिक न होता तटस्थपणे या देवस्थानची माहिती त्यांनी दिली आहे. या मंदिराची लिखित स्वरूपातील फारशी माहिती उपलब्ध नसतानाही त्यांनी अनेकांच्या गाठीभेटी घेऊन ही माहिती मिळवली आहे. या देवस्थानासंबंधी असलेली लोकगीते, भक्तिगीते या साऱ्यांचा वेध घेऊन त्यांनी या देवस्थानाची पूर्ण माहिती मिळेल असे पुस्तक लिहिले आहे.