Summary of the Book
मधुर गाणे, वादनाने कान तृप्त न होणाऱ्यांना वारंवार ती ऐकण्याचा छंद, आवड असते. यातून ध्वनीमुद्रण शास्त्राची निर्मिती झाली. ध्वनिमुद्रिकांचा शोध त्यातून लागला. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ध्वनिमुद्रिका इतिहास जमा झाल्या आहेत. संगीत क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या या ध्वनिमुद्रिकांचा रंजक इतिहास जयंत राळेरासकर यांनी 'ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत 'मधून सांगितला आहे.
१८७७ पासून सुरु झालेला ध्वनिमुद्रिकांचा प्रवास यात आहे. एच. एम. व्ही. कंपनीचा लोगो असलेला कुत्रा ही ध्वनिमुद्रीकेची ओळख बनली. त्याची हकीगत यात आहे. 'यंग इंडिया ', 'हिंदुस्तान रेकॉर्ड्स' या भारतीय कंपन्यांची कामगिरी, १९०५ मध्ये किरण घराण्याचे गायक अब्दुल करीम खाँ यांनी ध्वनिमुद्रिकांसाठी रेकॉर्डिंग दिले. तेव्हापासून अनेक प्रतिष्ठित गायकांच्या रेकॉर्ड्स निघू लागल्या.
यातील गोहरजान, कुंदनलाल सैगल, जानकीबाई ऑफ अलाहाबाद, कवी संजीव, बालगंधर्व केसरबाई केरकर, मेहबूबजान, बाई सुंदरबाई यांच्या आठवणी, त्यांचे रेकॉर्डिंग यांची अनोखी माहिती मिळते, तसेच झोपडित राहूनही ध्वनिमुद्रिकांचा संग्रह करणारे मल्लपा अंकलगी, लंडनमधील 'नॅशनल साऊंड आर्काइव्ह' याची ओळख यातून करून दिली आहे त्याचबरोबर संगीतासंदर्भात महात्मा गांधी, पं. नेहरू, रवींद्रनाथ टागोर, विवेकानंद यांच्या आठवणीही सांगितल्या आहेत.