कथा या प्रामुख्याने कौटुंबिक चौकटीत लिहिलेल्या असतात. परंतु उर्मिला सिरूर यांच्या कथांमधून व्यापक विषय येतात. याची प्रचिती 'पंख' या कथासंग्रहातून येते. स्त्रीच्या बदलत्या जाणिवा, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्त्रीचे समाधान हे या कथांमधून उमटते. 'पारंबी' तून मोठा गोतावळा असलेल्या कुटुंबातील सुनेला पुराण वटवृक्षासारखे वाटणारे सासरे व त्यांचे वाढते कुटुंब याची गोष्ट सासूबाई सांगतात. विमानतळावर आलेल्या सुंदर महिलेवर खिळलेल्या प्रवाशांच्या नजरेचे दर्शन 'दंश' मधून होते. 'मजनूचे डोळे' मधून आशुतोष नावाच्या हिरोची ओळख होते. पती- पत्नी विभक्त झाल्यावर मिनोती व शम्मी या मुलींची होणारी फरफट 'पंख' मध्ये व्यक्त होते. सपनाच्या आगमनाने दोन्ही शेजारांमध्ये आनंद पसरतो. पण सपनाच्या रुपात आपली आजी परतली आहे, या विचाराने अस्वस्थ झालेल्या शेजीबाईला 'मी तर सपना... फक्त सपना' असे सांगून चिमुकली 'सपना' तून आश्वस्त करते. मानवी जीवातील आनंद, दु:ख, घालमेल, अस्वस्थता, शांतता असे सर्व जाणिवा यातील सर्व कथांमधून जाणवतात.
‘पंख’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5192563985477440525