Summary of the Book
दिवसेंदिवस आपली सर्वांची आयुष्यं जास्त जास्त धकाधकीची होत चालली आहेत. आपण सदैव घाईगडबडीत असतो आणि काही अंशी तरी आपली धावपळ, आपले ताणतणाव, चिडचिड, ह्यांचं कारण आपली मनोभूमिका असते. ही परिस्थिती कशी सुधारता येईल, आणि आपलं रोजचं आयुष्य जास्त प्रसन्न, सुखद कसं करता येईल, ह्याबद्दलचे विचार ह्या पुस्तकात आहेत. मुख्यत: विचार हा आहे, की आपण सर्वांनी असेल त्या परिस्थितीत समजूतदारपणानं, आनंदानं रहाण्याचा प्रयत्न करावा, आपल्या आणि इतरांच्याही मनावरील ताण कमी करण्यासाठी झटावं, इतरांच्या अडचणीही समजून घ्याव्या, आपल्या लहान सहान अडचणींचा बाऊ न करता शांतपणे त्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे, ज्या गोष्टी बदलणं शक्य नाही, त्यांचा स्वीकार करून, त्यांसकट प्रसन्न रहाण्याचा प्रयत्न करावा. ह्या प्रयत्नांनी अडचणी नाहीशा होणार नाहीत, पण आपल्या मनाला त्याचा त्रास कमी नक्कीच होईल."