Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
बनगरवाडी. माणदेशातल्या एका 'लेंगरवाडी' नावाच्यावाडीवर बेतलेली वाडी. १९३८ साली माडगूळकर त्या गांवी होते तेव्हा तिथल्या अनुभवांचे वर्णन कादंबरीरूपात 'बनगरवाडी' या नावाने आपल्यासमोर येते. स्वतः माडगूळकरही त्याच भागातले. ९९साली माडगूळकरांनी कादंबरीत काही रेखाटने करावी असे ठरल्याने ते पुन्हा त्या वाडीत गेले. आणि ३८ सालच्या लेंगरवाडीत जवळजवळ साठ वर्षांनीही काही फरक पडला नसल्याचेच त्यांना जाणवले. व्यंकटेश माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेली बनगरवाडी वाचकाला अद्भूत अनुभव देते. बनगरवाडी या छोट्याच्या गावात भेटतात ते कारभारी, अंजी, दादू, आयाबू, आनंदा रामोशी, रामा, शेकू आणि त्याची उंच बायको. या प्रत्येकाची शरीरवैशिष्ट्ये जशी आहेत, तशी स्वभाववैशिष्ट्ये. प्रत्येकाला एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. हे गाव माडगुळकर यांना जसं दिसलं, तसं ते त्यांनी चितारलं आहे. केवळ लेखणीतूनच नव्हे तर; कुंचल्यातूनही. माडगुळकर यांची रेखाचित्रं हे पुस्तकाच्या खास आकर्षणाचा एक भाग आहे.
Kadambari ajun khup vadhavta Ali Asti pan madgulkarani nemkya shabdat lihili. Shevat vachun ,aikun khup vait vatte . Khup mast kadambari
Harshali Rajput
14 Aug 2021 07 18 PM
खरंच खूप छान कादंबरी आहे. मी पहिल्यांदा वाचली यातील पात्र, घटना, ग्रामीण भागातील मायाळूपणा यांचे दर्शन करायला या कादंबरीत मिळाले. पूर्वी गावातील मास्तरांना किती मान होता सर्वजण सल्लामसलत करण्यासाठी मास्तरांकडे चे यायचे.. व मास्तरांनी सांगितलेले ते ऐकून घेत होते. व त्या बनगरवाडी मास्तरांनी राहून अनेक सुधारणा केल्या हे ही छान होते. आणि मुख्य त्या म्हणजे मुख्यतः म्हणजे या कादंबरीत धनगरांचे जनजीवन हे पूर्वी कसे होते याचे चित्रीकरण केलेले दिसते.
खरंच कादंबरी खूप छान होती...
Yogesh
25 Sep 2020 09 32 AM
अस्सल ग्रामीण जीवनाचे चित्र माडगूळकरांनी थोड्या शब्दात सांगितले आहे पण या थोड्या शब्दाचा आशय ही खूप मोठा आहे यातील पात्रे वाचताना वाचकाला असे वाटतें की ही आपल्या आजूबाजूला आहेत.
it s very good writing and description, it lead us to the real life style of the sheferds... Mr.Madgulkar has counted all small small thing in this novel. really its fabulous novell. only a marathi man can give such type of product. hans off for Mr.Madgulkar. Thx.
Shashikant Oak
15 Apr 2012 01 31 PM
कॉलेजमधे आम्हाला ही कादंबरी अभ्यसाला लावली होती. प्रभावी व्यक्तिरेखा व निसर्गपरिसराचा विदारक अनुभव....
आरती वाळेकर
21 Jun 2011 04 48 PM
गाव कितीजरी लहान असलं तरी त्या गावात अनेक भानगडी घडत असतात. अशाच अगणित भानगडी घडलेल्या एका ग्रामीण भागाची ओळख यात अत्यंत सुंदररित्या या पुस्तकात केली आहे.
YOGESH NARVEKAR
01 Feb 2011 12 38 AM
good
शरद अजगेकर
25 Jan 2011 03 57 PM
खूप कमी शब्दात आणि नेमकेपणाने अस काही लिहिता येत हे
बनगरवाडी वाचून कळले. खूपच छान...
ekanath suryawanshi
06 Jan 2011 02 41 PM
It is very heart touching & can't forget it.
विजय Pawar
29 Dec 2010 07 50 PM
मी हे पुस्तक खूप वर्षे आधी वाचले होते, पुस्तक खूप छान आहे.