Summary of the Book
विस्मृतीत गेलेली, मात्र महत्वपूर्ण ठरलेली मोडी लिपी शिकण्याची इच्छा असेल, तर हे पुस्तक जरूर संग्राह्य ठेवावं. श्रीकृष्ण लक्ष्मण टिळक यांनी याचं संपादन केल आहे. बाराव्या शतकापासून सुमारे सात शतकं मोडी लिपी राज्यव्यवहार आणि दैनंदिन कामकाजात वापरली जात होती. त्यावेळच्या कागदपत्रांत अनेक राजकीय व्यवहार आणि रहस्य दडलेली आहेत.
त्यामुळे मोडी लिपी शिकणं महत्वाचं ठरलं आहे. देवनागरी आणि मोडी लिपीत बरीच समानता दिसते. दोन्हींमधील स्वर आणि व्यंजन संख्या समान आहे. त्यामुळे ही लिपी शिकणंही सुलभ आहे. पुस्तकात मोडी लिपीच्या रचनेसह प्रश्नमंजुषा, उजळणी पाठ्यक्रम, मोडी लिपीतील पत्रं, यांचाही समावेश करण्यात आला आहे.