Hard Copy Price:
25% OFF R 180R 135
/ $
1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
"थट्टा मस्करी " हे डाॅ रविंद्र तांबोळी लिखित पुस्तक नुकतेच वाचनात आले. मस्तच लिहिलंय..... समाजातील अनेक विषयावर मार्मिक...थट्टा मस्करी केली आहे. पुस्तक वाचताना एकटं एकटं, खुदू खुदू गालात हसल्याशिवाय राहणं शक्यच नाही.
विनोदी साहित्यात एका झकास पुस्तकाचा प्रवेश , एकदा तरी आवर्जून वाचायलाच हवे , ज्यांना आपणास खुष होतांना पहावं असं वाटतं त्यांनाही... थट्टा मस्करी विषयी आपला अनुभव शेअर करायला हरकत नाही.
...... मजा आली पुस्तक वाचून..
satyanarayan bajaj
20 May 2019 12 37 PM
excellent book
its on realistic experience with blend of comedy
must read
वैभव निमगिरे
16 May 2019 03 46 PM
समाजजीवनात जे जे उपहासनीय असते त्याची कालानुरूप थट्टा मस्करी करणे हे विनोदी लेखकाचे आद्य कर्तव्य मानायला हवे.असे करताना सामाजिक जीवनात अतिप्रतिष्ठित म्हणून वावरणाऱ्यांची थट्टा करणे हे तर अतिशय धाडसाचे काम !
हे धाडस रवींद्र तांबोळी ह्या लेखकाने आपल्या “थट्टामस्करी “,ह्या अफलातून पुस्तकाद्वारे दाखवले आहे .
Ranjeet sarawade
26 Apr 2019 11 28 AM
सहज हसवणारा विनोद. वेगवेगळे नवेच विनोदांचे विषय. हे पुस्तक वाचताना स्वत:सी आपोआप हसू येते. मज्जा येते. एका बैठकीतच वाचावे लागते इतका आनंद देते.
Jeevan Talegaonkar
16 Apr 2019 08 49 AM
स्वतःच विनोदी लेखसंग्रहास प्रस्तावना देऊन सुरुवातीलाच पुस्तकासंबंधी वाचकास जबरदस्त विश्वास देणारी 'रुजुवात' डॉ तांबोळींनी 'थट्टा मस्करी' च्या आरंभी लावली आहे. 'गिरकी', 'उसंतवणी' आणि आता 'थट्टा मस्करी'. डॉक्टरांचे विनोद मला वाच्यार्थात दडलेले वाटतच नाहीत, ते परोक्षप्रिय आहेत; लक्षणार्थी व व्यंग्यार्थी आहेत, म्हणून त्यांच्या शब्दांचे गहिरेपण विचारांचा अनुभवपट विस्तारत राहते. या अभिव्यक्तीसाठी त्यांनी निवडलेला फॉर्म ही त्यांची स्वनिर्मित नाममुद्रा आहे म्हणून मला ती मराठी साहित्यात स्वतःचा वेगळा प्रांत वसवणारी वाटते,