Summary of the Book
आपले सण व उत्सव हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. आपली संस्कृती टिकून राहण्यास आणि पुढे नेण्यास ते उपयुक्त ठरतात; तसेच सद्गुणांची परंपरा कायम राखतात. त्यामुळे नव्या पिढ्यांना सणांचे महत्व समजायला हवे. त्या दृष्टीने श्रीकांत गोवंडे यांनी या पुस्तकात आपया सण-उत्सवांची माहिती दिली आहे.
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला सण. पाठोपाठ रामनवमी, परशुराम जयंती, अक्षय्य तृतीय येतात. या सणांच्या माहितीबरोबर श्रवण महिन्यांतील सण, भाद्रपदातील गौरी - गणपती येतात. या सणांचे सांस्कृतिक महत्व पुस्तकातून समजते. दिवाळी, मकरसंक्रांत, होळी येते. पोंगल, ओणमसारख्या परप्रांतीय आणि ईद, नाताळ, नवरोज अशा अन्य धर्मातील सणांचीही ओळख होते.त्याचबरोबर स्वातंत्रदिन, प्रजाक्सताकदिन, गुरुनानक जयंती अशा उत्सवांची माहितीही पूरक चित्रांसह समजते.