Summary of the Book
बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर बॅंकिंग क्षेत्रात वेगवेगळी स्थित्यंतरे पाहिलेल्या देशाची आर्थिक वाटचाल कशी सुरू आहे, हे समजण्यासाठी "मैत्री बॅंकिंगशी' या पुस्तकाचा फायदा होईल.
सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असणारी माहिती या पुस्तकात आहे. याचा फायदा खेड्यातील नागरिकांसोबतच शहरी भागातील नागरिकांनाही होणार आहे.
मासिकाच्या आकारातील या पुस्तकामध्ये 20 प्रकरणांतून बॅंकेसंदर्भातील माहिती तर आहेच; तसेच अनेक योजनांचीही सविस्तर माहिती दिली आहे. बचत गटापासून बॅंकिंग लोकपालापर्यंतची माहिती यात आहे. बॅंकिंगच्या कामकाजात वापरले जाणारे शॉर्टफॉर्म्स इथे विस्ताराने संपूर्ण एका प्रकरणात दिले आहेत. छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या बाबी या पुस्तकातून कळू शकतील.