खिडक्या अर्ध्या उघडया
Assorted Stories Ganesh Matkari Kathasangrah Khidakya Ardhya Ughadya Khidkya Ardhya Ughadya Samakalin Prakashan Short Fiction Stories Stories Happen In Metro Story Ten Assorted Stories. कथासंग्रह खिडक्या अर्ध्या उघडया गणेश मतकरी समकालीन प्रकाशन
Out Of Print

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
लेखक, समीक्षक गणेश मतकरी यांच्या १० कथांचा हा संग्रह. अर्ध्या खिडक्यांमधून डोकावणाऱ्या जगाचे हे दर्शन. हे विश्व आजच्या काळाचे आहे. नवे, आधुनिक जग अनुभवणाऱ्या आणि त्या जगाचे सर्व टक्के टोणपे खाणाऱ्या बदलत्या मध्यमवर्गीय माणसांचे हे दर्शन आहे.

या सगळ्या कथा शहरी भागात घडतात. मोठी शहरे, चकचकीत वातावरणात त्या घडतात. पैसा, प्रसिद्धी, सत्ता या गोष्टी मिळवताना खरेखुरे जगणे, माणूसपण विसरतेय का, याचा शोध त्यांतून घेतला जातो; तसेच सामाजिक काम करण्याची इच्छा असणाऱ्या महत्वाकांक्षी माणसांचे जगणेही त्यातून समजते.

मतकरी यांची भाषाही कथावस्तूशी साधर्म्य दाखवणारी आहे. त्यामुळे आजचा काळ, या काळाचे प्रश्न अधिक ठळक होतात.
Book Review
Write a review

Abhay Salvi
27/05/2017

'खिडक्या..' हि कथामालिका असली तरी एक प्रॉपर कादंबरी आहे. त्या मधली व्हिज्युअल डिटेलिंग ही पटकथे समान असली, तरी एका अँगल ने मला हे कथानक नाटकासारखं ही वाटतं! नाटकांत जसं दोन प्रवेशांच्या मध्ये काहीसं घडून गेलं असतं आणि नंतर व आधी त्याची चाहूल अथवा पडसाद दिसत राहतात तसंच या एकमेकांशी जोडलेल्या कथा करतात. टायटल मधलं 'अर्ध्या उघड्या..' या अर्थीही जष्टीफाईड होऊन जातं. 'भारद्वाज' ही कथा कथानकात मोधोमद येते आणि इतक्या वेळ आपण जे वाचत होतो, त्याची खरी दिशा आणि मार्ग सुचवते. 'खिडक्या..' चं मला दिसणारं सर्वात मोठं बलस्थान हे त्याच्या पात्रांच्या व्यक्त होण्यात आहे! ऑलमोस्ट सगळ्या कथा त्या त्या पात्रांना तसा चान्स देतात. ही पात्रे स्वतःबद्दल खूप काँशियस वाटतात, स्वतःचा सखोल अभ्यास करतायत असं वाटतं मात्र व्यक्त होताना त्यांची एक खबरदारी ही दिसून येते. ही खबरदारी म्हणजे आजच्या एकूण काळाचा मूळ गुणधर्म! माझा मी, तुझा तू हे जे माणसाचं 'आयलंड' असणं आहे ते हेच! 'खिडक्या' हे या आजच्या स्पेस अँड टाईमचं असं अभ्यासपूर्ण डॉक्युमेंटायजेशन आहे जे बदलणाऱ्या स्पेस अँड टाईम मध्ये या काळाचं एक महत्त्वाचं प्रतिबिंब ठरेल!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat