Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
काळसेकरांच्या रोजनिशीत साहित्य म्हंटले की त्यात वृत्त पत्रे येतात, नियतकालिके येतात, अनियतकालिके येतात, विशाल ग्रंथराज येतात, कितीतरी विविध प्रकारचे लेखन येते. लोकभाषा आणि प्रमाण भाषा ह्या विषयी चर्चा येते समाजातले अगदी तळागळापासुंचे अनेक स्तर येतात. लोकभाषेवरच्या त्यांच्या प्रेमात लोकांवरचे प्रेम दिसून येते.
आणि लोकांवरचे प्रेम ह्या गुणाला त्यांच्या मार्क्सवादीतील सामाजिक जाणीव कारणीभूत आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. करण काही माणसांत प्रेम करायची आणि ते मिळवण्याची शक्ती असते. ती कुठल्याही विचारसरनीवर अवलंबून नसते. काळसेकारांच्यात ती शक्ती आहे.मी १९६३ च्या सुमारास काळसेकारांच्या डोंबिवलीच्या जागेत गेलो होतो. त्यांच्या संसाराला नुकतीच सुरुवात होत होती. फर्निचर अगदीच बेताचे होते. मुख्यतः जिथे जागा मिळेल तिथे पुस्तके होती.
सुमारे पंचेचाळीस वर्षांनी मी त्यांच्या पेणच्या जागेत गेलो होतो. डोंबिवलीत असलेल्या लहानशा ग्रंथसंग्रहाचा विशाल ग्रंथवृक्ष झाला आहे. त्याला एका खोलीत डेरेदार बुंधा आहे अन त्याच्या पारंब्या बाकीच्या सर्व खोल्यांत पसरल्या आहेत. त्यांच्या फांद्यांवर आंबेडकरांपासून वेदांपर्यंत, मार्क्सपासून निट्शेपर्यंत आणि तुकारामापासून अरुण कोलटकरांपर्यंत मंडळींची मांदियाळी आहे. ह्या वृक्षाच्या सावलीत आज काळसेकर पतीपत्नी राहताहेत. मुंबईला यायला दोघेही राजी होत नाहीत.तेही रास्तच आहे.