Summary of the Book
या पुस्तकात आपल्याला भेटणार आहेत पीटर, जेनेट, जॅक, पॅम, बार्बरा, कोलिन आणि जॉर्ज. हे सर्वजण आहेत सात गुप्तहेर आणि स्कँपर - एकदम खास स्पॅनिअल कुत्रा! कोणत्याही रहस्याचा छडा लावण्यासाठी एका पायावर तय्यार! `सीक्रेट सेव्हन'नं मीटिंग घेण्यासाठी नवी कोरी जागा निवडली आहे. पण आणखी कुणीतरीसुद्धा ही जागा वापरत आहे. त्याची ही हिंमत? तो रोज रात्री तिथे जात रहातो. `...पण आपली टोळी आता ह्याला पूर्णविराम देणार आहे. वाट्टेल ते होऊ दे, ह्या आगाऊ पाहुण्याला पकडण्याचा `सीक्रेट सेव्हन'नं निश्चयच केला आहे.