Summary of the Book
आकर्षक दिसावे ही बहुतेक स्त्री व पुरुषांची इच्छा असते. सुयोग्य बांधा असल्यास आपोआपच आत्मविश्वासही वाढतो. पण बेढब शरीर, जास्त वजन असल्यास न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळेच स्वत:चे शरीर निरोगी व प्रमाणबद्ध वजन राखायचे असेल, तर आहारावरील नियंत्रण महत्वाचे ठरते.
पण डाएट करणे म्हणजे फक्त उकडलेल्या भाज्या, कडवट रस, सलाड खावे लागणार ही धास्ती मनात न धरता नेहमीचेच पदार्थ आवश्यक तेवढे आहारात वैविध्य आणता येते, हे कविता महाजन यांनी 'समतोल खा सडपातळ रहा' या पुस्तकातील पाककृतींमधून दाखवून दिले आहे.
नाश्ता, रस आणि इतर पेय, सलाड, सूप, सार, जेवणातील चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, वरण, आमटी, कढी, पोळी, भाकरी,फुलके, भात, पुलाव, मधल्या वेळचे खाणे, गोड पदार्थ, उपवासाचे पदार्थ अशा विविध पदार्थांच्या पाककृती यात दिल्या आहेत. हे रुचकर, समतोल व सकस पदार्थ वजन कमी करण्यासाठी आणि ते वाढू न देण्यासाठी उपयुक्त तर आहेत. या पुस्तकातील आहारतज्ज्ञ स्वाती चंद्रशेखर यांची प्रस्तावना असून, वजन कमी राखण्यासाठी आहार नियोजनविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.