Summary of the Book
खाण्यापिण्याच्या सवयी एका दिवसात बदलता येत नाहीत; की त्या बदलायलाच हव्यात असं आपल्याला वाटू लागतं. अशी वेळ येण्यापूर्वीच आपण आपल्या आहाराकडे थोडं गंभीर होऊन पाहायला हवं. मग काय खावं, असा प्रश्न तुम्हाला पडेल. तेव्हा हे पुस्तक वाचा. डॉ. मालती कारवारकर यांनी यात प्रकृतीनुसार शास्त्रीयदृष्ट्या कसा आहार घ्यावा, याची माहिती दिली आहे.
आहारातून मिळणारी जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम यासंबंधी माहिती देतानाच बद्धकोष्टता, डायरिया, रक्तातील साखरेचे प्रमाण, हृदयविकार, कोलेस्टेरॉल. वजनवाढ, अॅसिडीटी, मधुमेह अशा विकारांची कारणे आणि असे विकार झाले तर काय खावे याचं मार्गदर्शन त्या करतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहाराचं नियोजन करण्यासाठी हे उपयुक्त.