Summary of the Book
आपण म्हणतो की उर्दूच्या श्रेष्ठ लेखकांच्या कथांमध्ये सावली सारख्या दिसणाऱ्या स्त्रिया इस्मत चुगताई आणि मेंटोच्या कथांमध्ये आपल्या हादमांसासहित जिवंत झाल्यासारख्या वाटतात. हे खरं आहे की प्रेमचंदने स्त्रियांचे मुद्दे आणि अन्याय, अत्याचाराबद्दल कथा लिहिल्या. परंतु एक- दोन कथा सोडल्या तर त्यांच्या कथांमध्ये स्त्री ऐवजी तिची कल्पना अधिक वाटते. त्यांच्या स्त्री पात्रांचं चित्रण सामंत युगातील संस्कृतीचं प्रतिबिंब वाटतं. परंतु इस्मत चुगताई एक अशी लेखिका होती जिने स्त्रीचं वंचित होण, भ्रम आणि अज्ञान याविरुद्ध आवाज उठवला.. सेक्सवर लिहिण्याचंही धाडस केलं.
मंटोची स्त्री पात्र प्राचीन आणि शाश्वत विवशतेचा खूप कठोरपणे अनुभव घेतात. परंतु पाठींबा किंवा विरोध ही करीत नाही. तो पात्रांना आपली स्थिती आणि उद्देश व्यक्त करण्यासाठी झुकवत नाही. सुंगधी, नीती, सिराज, निलम, नसीम, अख्तर आणि सकीना या सगळ्याच स्त्री पात्रांनी वेगवेगळ्या रुपात शोषणाची विभिन्न रूपं आपल्या शरीर आणि आत्म्याच्या स्तरावर भोगूनही आपल्या आयुष्याचे निर्णय स्वत: घेतले. विविध दृष्टीकोनातून पारखल्या जाणाऱ्या समाजापासून दूर केलेल्या स्त्रीला समाजात आणून तिला समजण्याच आणि समजावण्याचं धाडस मंटोने केलं आहे स्त्रीचं व्यक्तिमत्व बनविणारी, सजविणारी आणि बिघडविणारी समाजाच्या तत्वांची हकीकत आणि मिथकं काय आहे? हे समजण्यासाठी मंटो स्वत: ला स्त्री बनून अनुभव घ्यायला हवा असं म्हणतो.......